नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिस्कव्हरी चॅनेलसाठी मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शोचा होस्ट बेयर ग्रिल्स याच्यासोबतचा आपला प्रोमो पोस्ट केला होता. ज्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली. अशात सर्वच आतुरतेने वाट पाहत असलेला मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा शो डिस्कव्हरी चॅनेलवर आज प्रसारित होणार आहे.
मॅन व्हर्सेस वाईल्ड: माझा शो पाहा, पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन - व्हिडिओ
पर्यावरणासंबंधीच्या चर्चा आणि हवामान बदलावर प्रकाश टाकण्यासाठी मातृभूमीच्या मध्यभागी असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात, आज ९ वाजता तुम्हीही सहभागी व्हा, असं आवाहन मोदींनी भारताच्या नागरिकांना केलं आहे.
भारताच्या हिरव्यागार जंगलांपेक्षा चांगलं अजून काय असू शकतं? पर्यावरणासंबंधीच्या चर्चा आणि हवामान बदलावर प्रकाश टाकण्यासाठी मातृभूमीच्या मध्यभागी असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात, आज ९ वाजता तुम्हीही सहभागी व्हा, असं आवाहन मोदींनी भारताच्या नागरिकांना केलं आहे.
यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बाराक ओबामा यांनीही कार्यक्रमात उपस्थितही लावली होती. अलास्काच्या गोठवणाऱ्या थंडीत ओबामा यांचा मासा खाताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पंतप्रधान मोदींना अशा सर्व्हायवरच्या भूमिकेत पाहाण्यास लोकांमध्ये उत्सुकता आहे.