महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एसीपी राघव शास्‍त्रीच्‍या भूमिकेत करण वोहराच्या प्रवेशाने 'पिंजरा खुबसुरती का' होणार अजूनच रोचक! - 'पिंजरा खुबसुरती का' ही मालिका कलर्सवर

यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागला गेला आणि सर्व शुटिंग्सवर बंदी घालण्यात आली. परंतु यावेळी निर्माते वैकल्पिक योजना घेऊन तयार होते. बहुतांश मालिकांनी फटाफट आपले डेरे महाराष्ट्राबाहेर हलविले ज्यात कलर्सवरील ‘पिंजरा खुबसुरती का' मालिका देखील आहे.

'Pinjra Khubsurati Ka
'पिंजरा खुबसुरती का'

By

Published : May 18, 2021, 11:00 PM IST

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजनसृष्टीचे अतोनात नुकसान झाले. परंतु त्यातून बोध घेत टेलिव्हिजन मालिकांच्या निर्मात्यांनी मनोरंजनाचा स्रोत अखंड वाहत राहण्यासाठी काही योजना आखल्या होत्या. बहुतांश मालिकांचे चित्रीकरण मुंबई होते आणि त्यासाठी मोठमोठाले सेट्स उभारलेले असतात. यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागला गेला आणि सर्व शुटिंग्सवर बंदी घालण्यात आली. परंतु यावेळी निर्माते वैकल्पिक योजना घेऊन तयार होते. बहुतांश मालिकांनी फटाफट आपले डेरे महाराष्ट्राबाहेर हलविले ज्यात कलर्सवरील ‘पिंजरा खुबसुरती का' मालिका देखील आहे.

कलर्सवरील लोक‍प्रिय मालिका 'पिंजरा खुबसुरती का' रोमांचक पटकथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मालिकेतील मयुराने (रिया शर्मा) तिच्‍या जीवनात लांबचा पल्‍ला गाठण्‍यासोबत अनेक आव्‍हानांचा सामना केला आहे, जेथे तिला तिची खरी क्षमता समजली आहे. ओमकारला (साहिल उप्‍पल) देखील जीवनाचा धडा मिळाला आहे. मयुराप्रती त्‍याची वागणूक देखील बदलली आहे आणि तो आता तिच्‍याकडे आदाराने वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागला आहे. मालिकेच्‍या सध्याच्या एपिसोडमध्‍ये ओमकार विशाखाने दिलेले कोडे सोडवतो आणि ताराला वाचवण्‍यासाठी हवेलीकडे धावत जातो. त्‍यानंतर मयुरा व ओमकार यांच्‍यामध्‍ये गैरसमज निर्माण करण्‍यासाठी विशाखा मयुराला खोटी माहिती सांगते. मयुरा त्‍यावर विश्‍वास ठेवते आणि‍ तिला वाटते की ओमकारनेच ताराला बंदिस्‍त ठेवले होते. तिला सर्व गोष्‍टी तिच्‍यापासून लपवून ठेवलेल्‍या ओमकारचा खूप राग येतो. ती ओमकारवर चिडून ओरडते आणि ताराला हॉस्पिटलला घेऊन जाते.

मालिका आणि नाट्य हे हातमिळवणी करून राहतात. मालिकेत नाट्य वाढविण्यासाठी नवनवीन पात्रे आणली जातात. ‘पिंजरा खुबसुरती का' मालिकेत एसीपी राघव शास्‍त्री ची एन्ट्री होणार आहे जी भूमिका साकारतोय अभिनेता करण वोहरा. राघव हा मोहक व उत्‍साही आहे, जो बालपणापासून मयुरावर प्रेम करीत असतो. मयुराच्‍या जीवनात त्‍याचा प्रवेश ओमकार व मयुरा यांच्‍यामध्‍ये अनेक वादविवाद निर्माण करेल आणि अधिकाधिक नाट्य निर्माण करेल याबद्दल शंकाच नाही.

मालिकेमधील आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना करण म्‍हणाला, ''मी पोलिस अधिकारी राघव शास्‍त्रीची भूमिका साकारण्‍यास उत्‍सुक आहे, जो सामान्‍य पोलिस नाही. तो अत्‍यंत चिडखोर, ‘दबंग’ व्‍यक्‍ती आहे, पण मजेशीर देखील आहे. मला अशा भूमिका आवडतात. राघव मयुरावर खूप प्रेम करतो आणि तिचा विश्‍वास जिंकण्‍यासोबत तिला आकर्षून घेण्‍यासाठी कुठल्याही ठरला जाऊ शकतो. मला खात्री आहे की प्रेक्षकांना एक नवीन आश्वासक भूमिका पाहायला मिळेल, जी मी साकारत आहे. मला विश्‍वास आहे की, राघव निश्चितच ओमकार व मयुराच्‍या जीवनामध्‍ये अनेक ड्रामा निर्माण करेल.''

'पिंजरा खुबसुरती का' ही मालिका कलर्सवर प्रसारित होते.

हेही वाचा - फक्त १५ मिनिटांत उरकले सोनाली कुलकर्णीचे लग्न!

ABOUT THE AUTHOR

...view details