महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी अन् सुव्रत अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो - marriage

सखी खास मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे

सखी अन् सुव्रत अडकले विवाहबंधनात

By

Published : Apr 12, 2019, 11:00 AM IST

मुंबई- 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जोडी म्हणजेच सखी गोखले आणि सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. पुण्यात त्यांनी लग्नगाठ बांधली. अनेक मराठी कलाकारांच्या उपस्थितीत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.

यावेळचे काही फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत सखी खास मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. सखी आणि सुव्रतच्या लग्नाला अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी, सुनील बर्वे, पूजा ठोंबरे असे कलाकार उपस्थित होते.

लग्नाआधी बुधवारी झालेल्या हळदीचा आणि मेहेंदीच्या कार्यक्रमालाही कलाकारांनी हजेरी लावली होती. पाहा या विवाहसोहळ्यातील काही खास फोटो -

ABOUT THE AUTHOR

...view details