मुंबई- 'मिर्झापूर-२' या वेबसीरिजमुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेल्या अभिनेते दिवेन्दू शर्मा याच्या मते हिटच्या संख्येपेक्षा त्याला परफार्मन्स अधिक महत्त्वाचा वाटतो.
दिवेन्दूने सांगितले की, “प्रेक्षकांकडून मला इतके प्रेम मिळाल्याचा मला आनंद वाटतो. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मला फक्त चांगले काम करणे आणि लोकांचे मनोरंजन करण्याची इच्छा आहे. हिट चित्रपटांमुळे नाही तर, चांगल्या अभिनयासाठी लोकांनी मला ओळखावे अशी माझी इच्छा आहे. मी गुणवत्तेवर जास्त विश्वास ठेवतो. "
हेही वाचा -'बिच्छू का खेल'ची स्टार कास्ट गंगा आरतीला लावणार हजेरी