मुंबई -बॉलिवूडची सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय - बच्चन हिच्या सौंदर्यांची भूरळ चाहत्यांवर पाहायला मिळते. वयाच्या ४५ व्या वर्षीही ऐश्वर्या रायचा हटके लूकची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. अलिकडेच पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायने सहभाग घेतला होता. यावेळीही तिचा जलवा पाहायला मिळाला.
नुकतंच ऐश्वर्याचं एक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे फोटो पॅरिस फॅशन वीकमधील आहे. या फोटोत ऐश्वर्या पर्पल रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने यावर तिचे फरचे शूज घातले आहेत. तिच्या या लूकवर सोशल मीडियावर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.