महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सप्टेंबरमध्ये प. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन - मनोहर पर्रीकर

महोत्सवाचे हे 15 वे वर्ष आहे. अभिषेक यांचे ज्येष्ठ शिष्य प. प्रभाकर कारेकर यांना तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'पं. जितेंद्र अभिषेकी' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

प. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन

By

Published : Aug 19, 2019, 8:05 PM IST

पणजी- देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला पंडित जितेंद्र अभिषेक संगीत महोत्सव 14 आणि 15 सप्टेंबर रोजी फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अभिषेक यांचे ज्येष्ठ शिष्य प. प्रभाकर कारेकर यांना तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'पं. जितेंद्र अभिषेकी' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या महोत्सवावाची माहिती देण्यासाठी कला अकादमी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यासाठी कला आणि सांस्कृतिक मंत्री तथा अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे, तरंगिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शौनक अभिषेकी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गावडे म्हणाले, महोत्सवाचे हे 15 वे वर्ष आहे. प. जितेंद्र अभिषेकी म्हणजे गोव्याच्या भूमीतील प्रतिभासंपन्न गायक कलाकार ज्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. या महान कलाकारच्या स्मृतीनिमित्ताने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवात देशविदेशातील कलाकार, अभिषेकी यांचे शिष्य, सहभागी होणार आहेत. हा महोत्सव 14 आणि 15 सप्टेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रसिकांना मोफत ऐकता येणार आहे.

प. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन

प्रेरणा पूर्ती झाल्याचे समाधान - शौनक अभिषेकी

महोत्सवामागील प्रेरणा काय होती, असे विचारले असता पं. जितेंद्र अभिषेकी यांचे चिरंजीव तथा तरंगिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शौनक अभिषेकी म्हणाले, हा महोत्सव पहिली तीन वर्षे कला अकादमीच्यावतीने आयोजित केला जात होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला योगदान देण्याचे सूचविल्यानंतर तरंगिणी प्रतिष्ठान सहभागी झाले. कारण कला अकादमीच्या उभारणीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या आठवणीत एखादे संगीत संमेलन व्हावे ही प्रेरणा होती. आज देशभरातील नामवंत संगीत महोत्सवात या महोत्सवाचा दबदबा निर्माण झाल्याचे पाहून समाधान वाटते. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 16 कलाकार सहभागी होतात.

ABOUT THE AUTHOR

...view details