मुंबई- ऐतिहासिक कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळं छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालं. अभिनेत्री पल्लवी वैद्य हिनं पुतळाबाईंच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला. पण हीच पल्लवी आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत दिसणार असून पल्लवी आता कॉमेडी करणार आहे. थक्क झालात ना? पण हे खरं आहे.
'पुतळाबाई'ची भूमिका साकारणारी पल्लवी वैद्य आता प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज - comedy show
तिचा कॉमेडीबद्दलचा अनुभव सांगताना पल्लवी म्हणाली, "मी याआधी कधीच विनोदी भूमिका केली नाही. ही माझी पहिलीच वेळ असून मला या सिझनची नक्कीच उत्सुकता आहे
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लवकरच चला हवा येऊ देच्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत. पुतळाबाईसारखी ऐतिहासिक भूमिका साकारलेली पल्लवी आता थुकरटवाडीत येऊन कॉमेडी करून प्रेक्षकांना किती मनोरंजित करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना या पर्वात पल्लवीला पाहता येईल.
तिचा कॉमेडीबद्दलचा अनुभव सांगताना पल्लवी म्हणाली, "मी याआधी कधीच विनोदी भूमिका केली नाही. ही माझी पहिलीच वेळ असून मला या सिझनची नक्कीच उत्सुकता आहे ." एकच भूमिका वर्षानुवर्षे करून कलाकार अनेकदा कंटाळतात मात्र अशात एखादं वेगळं काम त्यांच्यातील अभिनेत्याला वेगळंच समाधान आणि ऊर्जा मिळवून देतं. आता पल्लवी प्रेक्षकांना हसवण्यात किती यशस्वी होते, ते येत्या काही दिवसांत कळेलच.