इस्लामाबाद- पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज वायुसेनेने बदला घेतला आहे. या हल्ल्याचे पडसाद सर्वच क्षेत्रात उमटत असताना भारत- पाकिस्तानमध्ये उत्तर-प्रत्युत्तराचे सत्र सुरू झाले आहे. आता पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
पाकिस्तानात भारतीय चित्रपटांसह जाहिरातींवरही निर्बंध
पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
पाकिस्तानमधील सिनेमा एक्झीबेटर असोसिएशनने भारतीय चित्रपट प्रसारण न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथोरिटी (Pakistan Electronic Media Regulatory Authority) यांनी भारतातील जाहीरीती देखील प्रसारण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय वायुसेनेने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला केला. भारतीय वायुसेनेच्या'मिराज २०००' जातीच्या १२ विमानांनी जैशच्या तळावर १ हजार किलोचे बॉम्ब टाकल्याची माहिती आहे. यामुळेच पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.