मुंबई - चित्रपट निर्माते विक्रम भट्ट म्हणाले की ,डिजिटल प्लॅटफॉर्मवरील स्पर्धेत लक्षणीय वाढ झाली आहे. विक्रम लवकरच त्याच्या पुढील वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. ते म्हणाले, "नेटवर सीरियस फिक्शन सुरू करणारा मी बहुधा पहिलाच आहे. 'माया' आणि 'ट्विस्टेड' दोन्हींचाही चौथा सीझन चालू आहेत आणि मला याचा खूप आनंद झाला आहे. असे असले तरी यावेळी ओटीटीवर फासा पलटला आहे. इथला आशय आणि स्पर्धा जबरदस्त सुरू आहे."
ओटीटीवरील मालिकांचा आशय आणि मुकाबला जबरदस्त - विक्रम भट्ट - 'डर्टी गेम्स' ही वेब सिरीज विक्रम भट्ट यांनी लिहिली
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मालिकांची रीघ लागली आहे. इथला जबरदस्त आशय प्रेक्षकांना आकर्षित करीत असून स्पर्धाही तगडी असल्याचे मत चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी व्यक्त केले आहे.
![ओटीटीवरील मालिकांचा आशय आणि मुकाबला जबरदस्त - विक्रम भट्ट Vikram Bhatt](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9317483-thumbnail-3x2-pp.jpg)
विक्रम भट्ट
विक्रम त्याचा 'डर्टी गेम्स' हा आगामी प्रोजेक्ट घेऊन परत येत आहेत. संदीप धर आणि ओंकार कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजचे २७ ऑक्टोबरपासून शूटिंग सुरू होणार आहे.
'डर्टी गेम्स' ही वेब सीरिज विक्रम भट्ट यांनी लिहिली असून याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. त्यांची छोटी मुलगी कृष्णा भट्ट याची निर्माती आहे. यात खालिद सिद्दिकी आणि समय ठक्कर हे कलाकारदेखील आहेत.
TAGGED:
Vikram Bhatt latest news