महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूड 'क्वीन'ची OTT एन्ट्री : टेंम्प्टेशन आयलँडच्या शोची होस्ट बनणार कंगना रणौत - कंगना रणौत ओटीटी डेब्यू

अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करीत आहे. टेंम्प्टेशन आयलँडच्या (Temptation Island)भारतीय रुपांतरणामध्ये ती शो होस्ट करताना दिसेल. तिच्या या नव्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

OTT entry of Bollywood 'Queen'
बॉलिवूड 'क्वीन'ची OTT एन्ट्री

By

Published : Jul 14, 2021, 6:49 PM IST

गेल्या कित्येक वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करुन आपल्या चाहत्यांना खूश केले आहे. कंगना रणौतही टेंम्प्टेशन आयलँडच्या (Temptation Island)भारतीय रुपांतरणामध्ये सहभागी होत ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती या शोच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.

टेंम्प्टेशन आयलँडच्या शोमध्ये जोडपी आणि सिंगल लोक येत असतात. इथे त्यांच्या आपल्या साथीदारासोबत असलेले नाते, संबंध याची चाचणी केली जाते. कंगनाची ही ओटीटी एन्ट्री चाहत्यांना सुखावणारी असणार आहे. आजपर्यंत रुपेरी पडद्यावर अभिनय करणारी कंगना पहिल्यादाच एक शो होस्ट करताना दिसेल.

सध्या कंगना रणौत धाकड या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. बुडापेस्टमध्ये याचे शुटिंग सुरु असल्याचे अपडेट तिने अलिकडेच दिले होते. या चित्रपटाला एक स्पाय थ्रिलर म्हणून ओळखण्यात येत आहे. रजनेश रझी घई दिग्दर्शित हा चित्रपट १ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. . 'धाकड' व्यतिरिक्त कंगनाच्या हातामध्ये थलायवी आणि तेजस या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा - इंदिरा गांधीच्या भूमिकेत अवतरणार कंगना रणौत, 'इमर्जन्सी'ची तयारी सुरू!!

ABOUT THE AUTHOR

...view details