महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बचपन का प्यार' सुपरहिट, जाणून घ्या कोण आहे या गाण्याचा मूळ गायक? - आदिवासी लोकगायक कमलेश बारोट

सहदेव या तिसरीतील विद्यार्थ्याने गायलेले 'बचपन का प्यार' हे गीत व्हायरल झाल्यानंतर या गीताचा मूळ गायक कोण असा प्रश्न पडतो. हे गाणे गुजरातमधील आदिवासी लोकगायक कमलेश बारोट यांनी गायले आहे. याबद्दल जाणून घेऊयात...

'Bachpan Ka Pyaar'
'बचपन का प्यार' सुपरहिट

By

Published : Jul 31, 2021, 6:17 PM IST

रायपूर- 'बचपन का प्यार' हे गीत व्हायरल झाल्यानंतर याचा सुकमा येथे राहणारा गायक सहदेव प्रचंड लोकप्रिय झाला आहे. परंतु 'बचपन का प्यार' या गाण्याचा खरा गायक कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

हे गाणे गुजरातमधील आदिवासी लोकगायक कमलेश बारोट यांनी गायले आहे. हे गाणे 2018 मध्ये बनवण्यात आले होते. हे ओरिजिनल गाणे देखील व्हायरल आहे. तिसराच्या वर्गात शिकणाऱ्या छत्तीसगडमधील सुकमाचा विद्यार्थी सहदेवने 'बचपन का प्यार' हे गाणे गायले आणि या गाण्याचे देशभर लोक वेडे झाले. भरपूर मीम्स आणि व्हिडिओज या गाण्यावर बनले होते.

तर 'बचपन का प्यार' या गाण्याचे मूळ गायक कमलेश बोराट यांनी 6000 गाणी गायली आहेत. तो एक गीतकार देखील आहे आणि स्वतः गाणी तयार करतो. खुद्द कमलेशनेही सहदेवचे कौतुक केले आहे.

हे गाणे भोजपुरी गायक मोनू अलबेला यांनी गायले असल्याचीही चर्चा आहे. मोनू अलबेला याने नुकतेच गाण्याचे रीशूट करून एक व्हिडिओ तयार केला आहे. मोनू अलबेला यांचे 'बचपन का प्यार' हे गाणे पुन्हा एकदा यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. अजय बच्चन यांनी हे गाणे लिहिले आहे. मोनू अलबेला सोबत महिला गायिका अंतरा सिंह प्रियांका हिनेही या गाण्याला आपला सुंदर आवाज दिला आहे.

हेही वाचा - आपल्या स्टाईलने भुरळ घालणाऱ्या 'ट्रान्स' सौंदर्यवती : 'आम्ही आहोत' ट्रान्स मॉडेल्स

ABOUT THE AUTHOR

...view details