सुपर डान्सर या नृत्य रियालिटी शोच्या चवथ्या पर्वात बच्चेकंपनीने आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने सर्वांचे मन जिंकले आहे. नुकतीच या शोमध्ये स्पर्धक फ्लोरिना आणि सुपरगुरू तुषार शेट्टी यांनी बॉलिवूडमधील श्रीदेवी या दिग्गज व सदाहरित अभिनेत्रीला विशेष श्रद्धांजली वाहिली. या भागात श्रीदेवीच्या काही उत्कृष्ट नृत्यांवर आधारित संस्मरणीय गाणी आणि मजेदार व अमर्यादित मनोरंजन मिळेल. दिवंगत सुपरस्टार श्रीदेवीच्या लोकप्रिय गाण्यांच्या मेलडीवर जोरदार अभिनय-नृत्यकला सादर करणाऱ्या जोरहाट, आसाममधील स्पर्धक फ्लोरिना गोगोई आणि तिचे सुपर गुरु तुषार शेट्टी यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. व्हॉईओओव्हर आणि व्हिज्युअलसह त्यांनी श्रीदेवी ला श्रद्धांजली वाहिली आणि तुषार ने फ्लोरिनाला श्रीदेवीचा प्रवास आणि लोकप्रियता याबाबत सांगितले.
फ्लोरिना आणि तुषार यांनी ‘जस्टिस चौधरी’ या चित्रपटामधील ‘मामा मिया’ ने सुरूवात करून आपल्या हिप-हॉप शैलीने आपले सामर्थ्य प्रदर्शित केले आणि त्यानंतर नैनो में सपना, हवा हवाई, खुदा गवाह आणि मेरी बिंदिया या श्रीदेवीच्या गाण्यांवर नृत्य सादर केले, टाळ्यांच्या गजरात. सुपर डान्सर शोचे परीक्षक गीता कपूर, मलाइका अरोरा आणि टेरेंस लुईस यांनी त्यांच्या नृत्याबद्दल तारीफ तर केलीच परंतु या गुरुशिष्य जोडीने अभिनय व नृत्यसामर्थ्याने अनेक वर्षे प्रेक्षकांना रिझविणाऱ्या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. टेरेंसने फ्लोरिनाच्या पदलालित्याचे, ‘यू किल्ल्ड इट’ म्हणत, कौतुक केले तर, मलायकाने फ्लोरिनाला “स्वैग क्वीन” (Swag Queen) संबोधिले.
“श्रीदेवी जी इतनी बड़ी हस्ती है ना, उनके लाइफ को इतने छोटेसे समय में सम्मान देना बहुत ही मुश्किल काम हैं’, गीता कपूर म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ‘श्रीदेवीचे फिल्म इंडस्ट्रीमधील कार्य एवढे मोठे आहे की ते काही मिनिटांत सांगू शकणार नाही. खरोखरीच, तुमच्या नृत्य-गाण्यातील शेवटची ओळ, ‘वह चांद की चांदनी बनकर हमें रोज स्पर्श करती हैं’ सार्थ आहे. तिने तुषारच्या कोरिओग्राफीचे कौतुक केले तसेच फ्लोरिना ला ‘हॅप्पी फिट’ (Happy Feet) आहेत असे म्हणाली. गीताने श्रीदेवी सोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलेल्या आठवणींना उजाळा देखील दिला.