मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा ३५ वा वाढदिवस काल साजरा झाला. 'प्यार का पंचनामा'मधील या लोकप्रिय अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. तो सध्या खूप चर्चेत आहे. यात ती आईसोबत गाण्यावर नाचताना दिसत आहे.
दम दमा दम' गाण्यावर आईसोबत थिरकली नुसरत भरुचा नुसरतने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात तिचे बर्थडे सेलेब्रिशन चॉकलेट केक आणि कुकीजने झाल्याचे दिसते. तिचा मित्र गुरमित कौरने हा केक पाठवला होता.
दम दमा दम' गाण्यावर आईसोबत थिरकली नुसरत भरुचा दुसऱ्या व्हिडिओत ती आपल्या आईसोबत 'दम दमा दम' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. आमिर खान आणि माधुरी दीक्षितच्या दिल या सिनेमातील हे गाणे आहे.
सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तिच्या मित्र मैत्रिणींनी सोशल मीडियावरुनच शुभेच्छा दिल्या आहेत.
नुसरत भरुचाचा बॉलिवूड प्रवास दिबाकर बॅनर्जी यांच्या लव्ह 'सेक्स और धोका' या सिनेमापासून झाला. यात राजकुमार रावची भूमिका होती. दोघांनीही या सिनेमातून आपला बॉलिवूड प्रवास सुरू केला. त्यानंतर 'छलांग' या सिनेमात त्यांनी पुन्हा स्क्रिन शेअर केला होता.