महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#PMModiOnDiscovery' ने ट्विटरवर रचला नवा इतिहास - डिस्कव्हरी चॅनेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिस्कव्हरी चॅनेलसाठी मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये सहभाग घेतलाय. त्यांचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर वादळ निर्माण करीत आहे.

मॅन व्हर्सेस वाईल्ड

By

Published : Jul 31, 2019, 9:58 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिस्कव्हरी चॅनेलसाठी मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये सहभाग घेतलाय. त्यांचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर वादळ निर्माण करीत आहे. या शोचा होस्ट बेयर ग्रिल्स याने हा प्रोमो ट्विटरवर पोस्ट केल्यापासून हे वादळ घोंगाऊ लागलंय.

दोनच दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरचे जग जिंकले आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये बेयर ग्रिल्ससोबत मोदी यांनी जंगलात भटकंती केली होती. पर्यावरणासंबंधीच्या अनेक मुद्द्यावर यात दोघांची चर्चा झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहे.

#PMModiOnDiscovery हा हॅशटॅग हा एखाद्या टीव्ही शोसाठी ट्विटरवर सर्वाधिक वापरला गेलेला टॅग बनला आहे. केवळ १२ तासात ७२८ दशलक्ष लोकांनी हॅशटॅग केलंय. मेल्टवॉटर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यम संस्थेने ही माहिती दिली आहे.

मॅन व्हर्सेस वाईल्ड हा शो डिस्कव्हरी चॅनेलवर १२ ऑगस्टला प्रसारित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details