नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडले ‘नॉमिनेशन एक्स्प्रेस’ हे कार्य. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य. आता बिग बॉसच्या घरात मासळी बाजार भरला आहे आणि सदस्य मासे विकताना दिसले. विकास म्हणाला, ‘पापलेट आहे बांगडा आहे आणि सारंगी पण आहे.’ जय तर माश्यांचे भाव अश्याप्रकारे लावतो आहे की त्यावर विशाल म्हणाला, ‘थांब बँकेत जाऊन कर्ज काढतो.’ आपल्या टीमकडे कसे पैसे जास्त गोळा करता येतील यासाठी घरातील सदस्यांमध्ये सुरू झाले चोरी करण्याचे प्लॅनिंग. याचविषयी मीरा, जय, उत्कर्ष यांची चर्चा झाली की, पैसे लपवूया तर दुसरीकडे, विशाल आणि मीनल यांची चर्चा सुरू आहे कसे पैसे चोरता येतील यावर.
सदस्य मासे विक्री करताना अशी किंमत लावत आहेत की प्रेक्षकांनादेखील प्रश्न पडला की नक्की हे मासे कुठले आहेत? मीनलने जयला माश्यांची किंमत विचारताच जय म्हणाला अडीच हजार. मीनल त्यावर म्हणाली सगळे अडीच हजारला द्या. जय त्यावर म्हणाला, काय बोलता तुम्ही. सोन्याचा मासा आहे, सोन्याचा... गायत्री म्हणाली अडीच हजारला कुठे असतो का मासा... जय म्हणाला, उत्कर्ष आमचे मालक आहेत बोटीचे. गायत्री म्हणाली तीनशे रूपायाला द्याना मला मासा. आता कॅप्टन्सीच्या या शर्यतीत कोण बाजी मारणार हे बघणे इंटरेस्टिंग असेल.