बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आविष्कारला काल घराबाहेर पडावे लागले तर या सिझनची दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री नीथा शेट्टी साळवी हिची एन्ट्री झाली. नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण बदलणार हे तर नक्की. घरातील सगळ्यात स्ट्रॉंग टीम उत्कर्ष, मीरा, गायत्री, जयमध्ये गैरसमजामुळे दुरावा आल्यासारखा दिसतोय. चुगलीमुळे गायत्रीला धक्का बसला आहे आणि तिचे डोळे आता उघडले आहेत असे तिने महेश मांजरेकर यांना बोलताना सांगितले. जय गायत्रीला म्हणाला आता तू फेन्सवर बसू नको, तू एकतर लेफ्टला उडी मार नाहीतर राईटला उडी मार, या बाईने तिकडेच उडी मारली. मीराचा वेगळाच गेम सुरू आहे. जय म्हणाला तिला सांग गेम तिच्याकडेच ठेव, हा गेम इकडे चालणार नाही. उत्कर्ष म्हणाला ती म्हणते आहे मी ऍक्टिंग करते आहे.
आता घरामध्ये रंगात आहे नॉमिनेशन टास्क. यावेळेसच नॉमिनेशन कार्य जरा इंटरेस्टिंग असणार आहे. बिग बॉसच्या घराला साजेसं असं तोरण लागणार आहे. ज्या सदस्यांचे फोटो तोरणावर नसतील ते सदस्य नॉमिनेट होतील. आता प्रश्न हा आहे की नीथा शेट्टी साळवी कोणत्या ग्रुपला जॉइन होणार.