नवी दिल्ली- लॉकडाऊनने चित्रपट निर्माता नितेश तिवारी यांना कॅमेऱ्यासमोर उभं केलं आहे. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी अमारिसालाही कौन बनेगा करोडपतीच्या स्क्रॅच फिल्मसाठी सिनेमॅटोग्राफर बनण्याची संधी मिळाली आहे. नव्या अभियानात अमिताभ बच्चन शोसाठी स्पर्धकांना आमंत्रित करताना दिसणार आहेत. मात्र, बिग बींच्या या नितेश तिवारी यांनी एक स्क्रॅच फिल्म तयार केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे या फिल्मचं चित्रीकरण घरीच केलं गेलं आहे. याशिवाय तिवारी यांनी सर्व सूचनांचं पालन करत खबरदारी घेऊनच प्रोमोचं दिग्दर्शन केलं आहे. तिवारींनी सांगितलं, की हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव आहे. कलाकारापासून इतकं दूर राहून आजपर्यंत मी कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण केले नाही. हा अनुभव माझ्यासाठी खास आहे.