काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठीकडून त्यांच्या परिवारात नऊ अभिनेत्री सामील होणार असे सांगण्यात आले होते. नवरंगांची उधळण करणारा आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा नवरात्रोत्सव सुरु झाला आणि याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी'ने आपल्या 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये सहभागी झालेल्या एकेक रत्नांना सर्वांसमोर आणले आहे. 'प्लॅनेट मराठी' चा 'प्लॅनेट टॅलेंट' उपक्रम दिवसेंदिवस बाळसं धरत आहे आणि अनेक प्रस्थापित आणि नवीन कलाकार या छत्राखाली येण्यास उत्सुक आहेत.
प्रॉमिस केल्याप्रमाणे त्या नवरत्नांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या नवरत्नांमध्ये सोनाली खरे, सुरभी हांडे, नेहा शितोळे, भाग्यश्री मिलिंद, रेशम श्रीवर्धनकर, पर्ण पेठे, दीप्ती देवी, ऋतुजा बागवे आणि प्रार्थना बेहेरेचा सहभाग झाला आहे. त्यामुळे आता 'प्लॅनेट टॅलेंट'च्या परिवारात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, गायत्री दातार, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, संजय जाधव, प्राजक्ता माळी, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, सायली संजीव यांच्यासह या नवीन नवरत्नांची नावेही जोडली गेली आहेत.