महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवं वर्ष कोरोनामुक्त जावो : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी - तेजस्विनी लोणारीने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

नव वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी येथे आल्या होत्या. मावळत्या वर्षातील कोरोनाच्या आठवणी मागे सोडत तसेच आरोग्यविषयक आलेले भान जपत नवं वर्ष कोरोनामुक्त जावो, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

tejasweni_lonari
तेजस्विनी लोणारी

By

Published : Jan 1, 2021, 12:50 PM IST

सातारा : मावळत्या वर्षातील कोरोनाच्या आठवणी मागे सोडत तसेच आरोग्यविषयक आलेले भान जपत नवं वर्ष कोरोनामुक्त जावो, अशा शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी आज रसिकांना दिल्या.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी

महाबळेश्वर मध्ये गुलाबी थंडीचा आनंद

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी महाबळेश्वर येथे शूटिंग व्यतिरिक्त प्रथमच फिरायला आल्या होत्या. महाबळेश्वरचे बाजारपेठेत खरेदीचा मनमुराद आनंद लुटत असताना त्यांनी ईटीव्ही भारतच्या माध्यमातून रसिकांशी संवाद त्या म्हणाल्या, खरं तर महाबळेश्‍वरमध्ये फिरायला येताना मूड नव्हता परंतु इथे आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटले. तसेच खूप सुरक्षितही वाटतय. चांगल्या पद्धतीने सामाजिक आंतर याठिकाणी राखण्यासाठी स्थानिक प्रशासन पुरेशी काळजी घेत असल्याचं जाणवतं. गर्दीच भान पाळून थंडीच्या मोसमात महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो हे जाणवतं.

हेही वाचा - २०२० : वादग्रस्त बॉलिवूडकरांचे सोशल मीडियावर रंगलेले वाद

सामाजिक भान अंमलात आणावे

त्या पुढे म्हणाल्या,"२०२० हे वर्ष आपण सर्वांनीच कोरोणाच्या संकटावर मात करून पार पाडलं. येणार नवीन वर्ष हे सर्वांनाच खूप चांगलं, आरोग्यपूर्ण तसेच कोरोना मुक्त जावो अशा शुभेच्छा मी देते."

२०२०मध्ये आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने जे सामाजिक भान आले आहे. ते आपण येत्या वर्षात अंमलात आणावे, अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले. नवीन वर्ष मराठी रसिकांना निश्चितच नवी कलाकृतीचा आनंद घेता येईल अशी खात्रीही त्यांनी रसिकांना दिली.

हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

ABOUT THE AUTHOR

...view details