रिचा चढ्ढा आणि रोनित रॉय प्रमुख भूमिकेत असलेला नवीन शो ‘कँडी’ मध्ये प्रेक्षकांना रूद्रकुंडमध्ये रोमांचकारी प्रवासावर नेईल. नुकताच याचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला जो लक्ष वेधून घेणारा, कुतूहल निर्माण करणारा, खिळवून ठेवणारा आहे. या मालिकेचे कथानक राजकारण, महत्त्वाकांक्षा, खून, रहस्य आणि इतर अनेक गोष्टींभोवती फिरते. आशिष आर. शुक्ला यांचे दिग्दर्शन असलेली ‘कँडी’ ही मालिका आपले दिग्गज कलाकार आणि रोनित रॉय आणि रिचा चढ्ढा यांच्या शक्तिशाली सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल.
हिवाळ्यातल्या एका सकाळी धुक्याने भरलेल्या पर्वतराजींमध्ये या शोला सुरूवात होते ती एका कोणतेही कारण माहित नसलेल्या खुनाने. ‘कँडी’ चा ट्रेलर अत्यंत उत्कंठावर्धक, कुतूहल निर्माण करणारा, खिळवून ठेवणारा, लोकांचे लक्ष वेधणारा आणि असंख्य ट्विस्ट्सनी भरलेला आहे. पर्वतांमधील अत्यंत देखण्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कँडी शोमधून अनेक रहस्ये उलगडतील आणि पापे समोर येतील. हे कथानक लोकांना आ वासायला लावेल. ते सस्पेन्स, राजकारण, महत्त्वाकांक्षा, भीती, आशा आणि इतर अनेक गोष्टींसोबत खुनाच्या रहस्याशी जोडलेले आहे.
रोनित रॉय म्हणाला की, “हा शो बघताना प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढेल अशी मला खात्री आहे. कँडी चे कथानक जिथे घडते, ती जागा अत्यंत रोमहर्षक आणि आकर्षक आहे. ही प्रचंड रहस्य, भीती, आशा आणि संशय यांनी भरगच्च असलेली कथा आहे. मला अनेक बुद्धिमान कलाकारांसोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा शो वेगळा नाही. दिग्दर्शक आशिष शुक्ला यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा अचूक आणि रहस्यमयी बनवली आहे. मला इतक्या छुप्या व्यक्तिरेखेची भूमिका करण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. मी ही भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक होतो. मी पापांचा पर्दाफाश कसा करणार हे पाहण्यासाठी ‘कँडी’ बघा.”