महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'रात्रीस खेळ चाले - 2' रंजक वळणावर वच्छीला होणार शोभाचा भास - New twist in serial Ratris Khel Chale

‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिका आता मोठ्या रंजक वळणावर अली आहे. कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले

By

Published : Nov 13, 2019, 12:36 PM IST

'झी मराठी' वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिका आता मोठ्या रंजक वळणावर अली आहे. 'रात्रीस खेळ चाले'च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले

प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत पाहिलं कि, अण्णांनी काशीसारखाच शोभाचा खून देखील केला आहे. शोभा घरी परतली नाही म्हणून एकीकडे वच्छी खूपच काळजीत आहे आणि दुसरीकडे पोलिसांची चौकशी जोरात सुरु आहे. वच्छी शोभला शोधण्याचे सगळे मार्ग वापरते. इतकंच काय तर रघु गुरुजींकडे देखील जाते. तिराहित तिला शोभाचं श्राद्ध घालायला सांगतो. वच्छीचा विरोध असून देखील हे श्राद्ध होणार आहे. या श्राद्धानंतर काशी आणि शोभा दिसणार आहेत. हा भास आहे कि सत्य? पोलीस तपासानंतर अण्णांपर्यंत पोहोचू शकतील का? याच उतर आता पुढच्या काही भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.

रात्रीस खेळ चाले

ABOUT THE AUTHOR

...view details