मुंबई -कोरोना काळात नवीन टेलिव्हिजन मालिकांनी प्रेक्षकांना बांधून ठेवलंय. उत्तम कथानकामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘पाहिले न मी तुला’ त्यांचे मनोरंजन करतेय. मालिकेत अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स बघायला मिळत असून पुढे काय होणार याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढतच आहे. आता या मालिकेत गर्भश्रीमंत दाखविलेला समर प्रताप जहागीरदारचं खरं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तो श्रीमंत आहे की गरीब हे पुढच्या भागांतून कळेल. समर हा स्वार्थी, दुष्ट, कपटी, स्त्री-लंपट, डूख धरणारा, बदला घेण्याची वृत्ती असलेला, एखादी वस्तू किंवा व्यक्ती मनात भरली की ती मिळेपर्यंत जीवाचं रान करणारा, वाट्टेल त्या थराला जाणारा इसम आहे.
‘पाहिले न मी तुला’ मालिकेत लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार ‘समर प्रताप जहागीरदार’ चं खरं रूप! - शशांक केतकर लेटेस्ट न्यूज
झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘पाहिले न मी तुला’ ही मालिकेत तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी या ‘लव्ह बर्ड्स’ बरोबरच प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे.
शशांक केतकर नकारात्मक भुमिकेत
झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘पाहिले न मी तुला’ ही मालिकेत तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी या ‘लव्ह बर्ड्स’ बरोबरच प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे. प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे. ते दोघेही त्यांचं लहानसं का होईना पण सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. पण या गोष्टीमुळे अपमानित आणि सैरभैर झालेला समर मानसीसाठी ईर्षेला पेटलेला आहे.
मालिकेला नवीन वळण
आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. समर हा खऱ्या आयुष्यात समर जहागीरदार नसून विजय धावडे असल्याचं लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. समरचं हे खरं रूप मानसीच्या आणि तिच्या परिवाराच्या समोर कधी येणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. लाल डोंगरी नावाच्या झोपडपट्टीत राहणारा विजय धावडे उर्फ विज्या खाचखळग्यातून चुकीच्या मार्गाने आयुष्य जगणारा, स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची वाताहत करणारा व्यक्ती आहे. तिथल्या वाईट संगतीत तयार झालेला, मागून मिळत नाही तर हिसकावून घेणारा, लालची आणि खुनशी असा विजय संगीता नावाच्या गरीब साध्या भोळ्या मुलीशी लग्न करून संसार रेटतोय, ते फक्त एका कारणासाठी कारण ती त्याच्यासाठी लकी आहे. 'पाहिले न मी तुला' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. झी मराठीवर प्रसारित होते.
TAGGED:
शशांक केतकर लेटेस्ट न्यूज