महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'इंडियन ओशन'चे नवे गाणे कोविड नायकांना समर्पित - म्युझिक बँड इंडियन ओशन

इंडियन ओशनने 'भारत के महावीर' या टीव्ही शोच्या माध्यमातून एक अँथम साँग सादर करुन कोविड-१९च्या नायकांचा सन्मान केला आहे. हे गाणे आशा, एकता आणि बंधुता याविषयी भाष्य करीत आहे. या कठीण काळात भारतासह जगाला या संदेशाची गरज आहे.

Indian Ocean
'इंडियन ओशन'

By

Published : Oct 24, 2020, 2:35 PM IST

मुंबई- देशातील अग्रगण्य म्युझिक बँड इंडियन ओशनने 'भारत के महावीर' या टीव्ही शोच्या माध्यमातून एक अँथम साँग सादर करुन कोविड-१९ च्या नायकांचा सन्मान केला आहे. या गाण्याचे बोल होते, "मंजिले हमसे खुद आज कहने लगीं, दिल में है हौंसला, जितेगी जिंदगी"

गाण्याच्या व्हिडीओमध्ये शोचे होस्ट दीया मिर्झा आणि सोनू सूद यांच्यासह भारतातील काही कोविड -१९चे नायक आहेत. शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. या संयुक्त निवेदनात बँडने म्हटले आहे की, “आम्हाला असे वाटते की, या नकारात्मकतेच्या काळात सकारात्मक गोष्टी आणणे फार महत्वाचे आहे. हे अँथम गीत तयार करण्यासाठी आम्ही 'भारत के महावीर' शी जोडले गेलो. चांगल्या विचाराने एकजूट होऊन समुदायाने प्रयत्न केल्यास कठीण परिस्थितीवर नक्की मात करू."

या गीताबद्दल दिया म्हणाली, "अँथम साँग आशा, एकता, एकता आणि बंधुता याविषयी भाष्य करीत आहे. या कठीण काळात भारतासह जगाला या संदेशाची गरज आहे."

'भारत के महावीर' ही मालिका असून ती तीन भागांत सादर केली जाईल. यात समन्वयतेच्या भावनांवर आधारित १२ कथा आहेत. त्याचा पहिला टप्पा डिस्कव्हरी चॅनेल आणि डिस्कवरी प्लस अ‍ॅपवर नोव्हेंबरमध्ये प्रसारित केला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details