सध्या संगीतप्रेमींची चांदी आहे. जवळपास सर्वच मुख्य वाहिन्यांवर संगीत रियालिटी शोज सुरु आहेत वा सुरु होत आहेत. या सांगीतिक रियालिटी शोजमुळे महाराष्ट्रात आणि देशातही नवनवीन प्रतिभांचा उदय होताना दिसतोय. आता स्टार प्रवाहवर सूर होतोय एक नवा सिंगिग रिऍलिटी शो, ‘मी होणार सुपरस्टार, छोटे उस्ताद’ ( Me Honar Superstar, Chote Ustad ) ज्यात सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर 9 (Sachin Pilgaonkar)) , लोकप्रिय गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे (Singer Adarsh Shinde) दिसणार जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.
स्टार प्रवाहवर सुरु होतंय गाण्याचं नवं पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’. ५ ते १४ या वयोगटातील छोट्या उस्तादांना या अनोख्या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळणार आहे. सचिन पिळगावकर यांना आपण याआधी जजच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र सिंगिंग शो ते पहिल्यांदाच जज करणार आहेत. तर वैशाली सामंत तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील.
हा कार्यक्रम सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे हे त्रिकुट हा कार्यक्रम जज करणार आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या कार्यक्रमासाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. तेव्हा बच्चेकंपनीच्या सूरांची ही अनोखी मैफल अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.
या कार्यक्रमाविषयी सांगताना सचिनजी म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबत माझं खुप जुनं नातं आहे. याआधी स्टार प्रवाहसोबत सुप्रिया-सचिन शो मी केला. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रवाहात सामील होताना आनंद होत आहे. मी आजवर पार्श्वगायक म्हणून २०० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मी बऱ्याच गाण्यांचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे. मात्र आजपर्यंत मी सिंगिंग शो आजवर जज केलेला नाही. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच सिंगिग शो जज करणार आहे. त्यामुळे खुपच उत्सुकता आहे. लहान मुलांसोबत त्यांच्या जगात हरवण्याची संधी हा कार्यक्रम नक्की देईल अशी भावना सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली.’
आदर्श शिंदे देखील या कार्यक्रमासाठी खुपच उत्सुक आहे. ‘स्टार प्रवाहच्या परिवाराचा मी जुना सदस्य आहे. पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना आनंद होतोय. हा कार्यक्रम नवी ऊर्जा आणि भरभरुन आनंद घेऊन येईल’, असं आदर्शने सांगितलं. तर वैशाली सामंत म्हणाली, ‘तसं पाहिलं तर माझा मुलगा १० वर्षांचा आहे त्यामुळे मी १० वर्ष आईपण जगते आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील मुलांना आईसारखंच प्रेम देईन. आताची पीढी ही टेक्नोसॅव्ही आहे. या पीढीसोबत जुळवून घेणं महत्त्वाचं आव्हान असणार आहे. त्यांच्या वयाला साजेसं त्यांना ग्रुम करणं, त्यांच्यातलं बेस्ट शोधून काढणं याची जबाबदारी आहे.’
‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा नवा सिंगिग रिऍलिटी शो प्रसारित होत आहे स्टार प्रवाहवर ४ डिसेंबरपासून रात्री ९ वाजता.
हेही वाचा - Ashok Saraf Felicitated At Piff : मराठी लोकांना जेवढी कॉमेडी कळते तेवढी कोणालाच कळत नाही अशोक सराफ