महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेता सचित पाटील पुन्हा छोट्या पडद्यावर, ‘अबोली’ मालिकेतून कमबॅक! - Sachit Patil in TV show Aboli

मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सचित पाटीलचं टेलिव्हिजनवर धमाकेदार पुनरागमन होणार आहे. तो आगामी ‘अबोली’ मालिकेत पोलीस इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. २३ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर 'अबोली ' ही नवी मालिका सुरु होतेय.

अभिनेता सचित पाटील
सचित पाटील

By

Published : Oct 30, 2021, 6:52 AM IST

मुंबई -कोरोना काळात छोट्या पडद्यापासून दूर गेलेला प्रेक्षकवर्ग पुन्हा टेलिव्हिजनकडे वळविण्यासाठी टीव्ही वाहिन्या बरेच प्रयत्न करताना दिसताहेत. अनेक मालिकांमधून मराठी चित्रपटांमधील स्टारमंडळी प्रेक्षकांना मनोरंजित करताना दिसतायं. मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सचित पाटीलचं टेलिव्हिजनवर धमाकेदार पुनरागमन होणार आहे. तो आगामी ‘अबोली’ मालिकेत पोलीस इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर नवी मालिका अबोली सुरु होतेय. या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तो छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच खाकी वर्दीत दिसणार असून त्यासाठी तो उत्साहित आहे.

या भूमिकेविषयी सांगताना सचित म्हणाला, “मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. मी स्टार प्रवाहचा खूप मोठा चाहता आहे. मी सगळ्या मालिका आवर्जून पाहतो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. मी खूपच एक्सायटेड आहे. स्टार प्रवाह सारख्या नंबर वन वाहिनी सोबत काम करताना खूपच आनंद होतोय. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय. या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.”

प्रेक्षकांनी सचितला याआधी ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सचित पुढे म्हणाला की, “मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलीस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.”

ABOUT THE AUTHOR

...view details