महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मृण्मयीचा नवीन शॉर्ट हेअर लूक नक्की कशासाठी..? - actress

कायमच सोजवळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या मृण्मयीचा हा नवा लूक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे

मृण्मयीचा नवा लूक

By

Published : Mar 28, 2019, 8:10 AM IST

मुंबई- नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ती सध्या एका नवीन भूमिकेच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी तिने तिचे लांबसडक केस कमी करून शॉर्ट हेअर ठेवले आहेत. मृण्मयीचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळेच या नवीन लुकची उत्सुकता वाढलेली आहे.

कायमच सोजवळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या मृण्मयीचा हा नवा लूक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. असे असले तरी मृण्मयी मात्र या नव्या हेअरकटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा हा नवा लूक चाहत्यांना निश्चितच घायाळ करेल यात शंका नाही.

मृण्मयीने नेहमीच आपल्या सालस सौंदर्यानं आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या नव्या हेअरस्टाईलमधून मृण्मयी एका वेगळया भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? हे येत्या काळातच प्रेक्षकांना कळेल. तोपर्यंत मात्र तुम्हाला यामागचं कारण कळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. नटसम्राट, कट्यार काळजात घुसली यासारखे सिनेमे आणि कुंकूसारखी मालिका करणारी मृण्मयी यावेळी कोणत्या कलाकृतीतून दिसते याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details