महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत डोहाळे जेवणाची लगबग.....! - टीव्ही मालिका ‘रंग माझा वेगळा’

‘रंग माझा वेगळा’ या टीव्ही मालिकेमध्ये दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. यासाठी ‘कुणीतरी येणार गं...’ म्हणत सगळेच तयारीला लागलेत.डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे.

new drama in 'Rang Mazha Vegla'
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत डोहाळे जेवण

By

Published : Apr 10, 2021, 1:00 PM IST

गर्भारपण हे प्रत्येक स्त्रीसाठी खास असते. तिच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारा तो क्षण असतो. गरोदर असताना डोहाळे तर लागतातच आणि ते पुरविण्याचे कर्तव्य स्त्रीच्या जवळच्या लोकांचे असते. स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लवकरच दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत डोहाळे जेवण

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. ‘कुणीतरी येणार गं...’ म्हणत सगळेच तयारीला लागलेत. डोहाळे जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात मात्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिरवी साडी आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये दीपाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. मात्र आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे. त्यामुळे डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

हेही वाचा - आमिर खानची मुलगी इरा करतेय मराठमोळ्या नुपुर शिखरेशी डेटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details