महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'साहो'च्या विलनचा अॅक्शन अवतार पाहिला का? - नील नितिन मुकेश

'प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे 'शेवट' असू शकत नाही', अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

'साहो'च्या विलनचा अॅक्शन अवतार पाहिला का?

By

Published : Aug 5, 2019, 8:32 PM IST

मुंबई - प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची जोडी असलेल्या 'साहो' चित्रपटाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीजर आणि दोन गाणी आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आत्तापर्यंत फक्त श्रद्धा आणि प्रभासच्याच लूकची चर्चा झाली. मात्र, आता 'साहो'चा विलनही समोर आला आहे.

अभिनेता नील नितीन मुकेश या चित्रपटात दमदार विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक असलेलं नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

'प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे 'शेवट' असू शकत नाही', अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

नीलने आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. आता 'साहो'मध्ये देखील तो अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे.
'साहो'चे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. हिंदीसह तेलुगू, तमीळ आणि मल्याळम भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details