महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘भाबीजी घर पर है'मध्‍ये आता दिसणार मराठमोळी नेहा पेंडसे ‘गोरी मॅम‘ च्या भूमिकेत! - Neha Pendse

अँड टीव्‍हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अनिता भाभीची भूमिका साकारण्‍यासाठी मोहक व प्रतिभावान नेहा पेंडसेची निवड केली आहे. या मालिकेत अनिता भाभीची भूमिका करणाऱ्या सौम्या टंडनच्या जागी आता मराठमोळी नेहा काम करणार आहे.

Neha Pendse
नेहा पेंडसे

By

Published : Jan 13, 2021, 12:23 PM IST

मुंबई - अँड टीव्‍हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है' प्रचंड लोकप्रियता अनुभवते आहे. यातील दोन्ही ‘भाभी’, देहाती अंगुरी भाभी आणि गोरी मॅम अनिता भाभी, सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत आहेत. सुरुवातीला देहाती अंगुरी भाभी शिल्पा शिंदे साकारत होती व तिने मालिका सोडल्यावर तिच्या जागी शुभांगी अत्रे ती भूमिका साकारू लागली परंतु अंगुरी भाभीच्या लोकप्रियतेत कमतरता नाही आली. आता दुसरी भाभी, म्हणजेच अनिता भाभी साकारणारी सौम्या टंडन, ही मालिका सोडतेय. अलीकडे तिच्या जागी कोणती अभिनेत्री येणार याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. पण आता प्रतिक्षाकाळ अखेर संपला आहे.

भारताच्या लाडक्या अनिता भाभीची भूमिका कोण साकारणार याच्या चर्चेतील सर्व अंदाजांना विराम देत मालिकेचे निर्माते बिनाफर कोहली आणि संजय कोहली यांनी अँड टीव्‍हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अनिता भाभीची भूमिका साकारण्‍यासाठी मोहक व प्रतिभावान नेहा पेंडसेची निवड केली आहे. खूप प्रतिक्षेनंतर आपल्‍या विभुती नारायण मिश्राचे (आसिफ शेख) त्‍याच्‍या पत्‍नीसोबत पुनर्मिलन होणार आहे. विभुती आणि त्‍याच्‍या नवीन गोरी मॅममधील केमिस्‍ट्री निश्चितच जोडप्‍यामधील धमाल व मनोरंजनामध्‍ये वाढ करेल. आणि मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गोड) आणि त्‍याच्‍या लाडक्‍या भाभीच्‍या अवतीभोवती असण्‍यासाठी त्‍याची हास्‍यजनक कृत्‍ये करताना निश्चितच चुकणार नाहीत. मालिकेमधील मोहकतेचा स्‍तर उंचावत नेहा पेंडसे नवीन रूपामध्‍ये दिसेल, ज्‍यामधून ग्‍लॅमर, हास्‍य व मनोरंजनाच्या पूर्ण डोसची खात्री मिळेल.

मालिकेमध्‍ये सामील होण्‍याचा आनंद व्‍यक्‍त करत नेहा पेंडसे म्‍हणाली, ''भारताची लाडकी अनिता भाभी कोण असेल, याबाबत महिन्‍यांपासून अनेक अपेक्षा व अंदाज वर्तवले जात होते. प्रेक्षक नवीन अनिता भाभीबाबत जाणून घेण्‍यासाठी तितकेच उत्‍सुक असण्‍यासोबत आतुरतेने वाट पाहत आले आहेत. मला मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेली लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है'चा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे. ही मोठी जबाबदारी आहे आणि निश्चितच मोठी उणीव भरून काढण्‍याची गरज आहे. पण, मला खात्री आहे की प्रेक्षक त्‍यांच्‍या नवीन अनिता भाभीवर तितकेच प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतील. मी लवकरच शूटिंग सुरू करण्‍यास उत्‍सुक आहे.''

हेही वाचा - अबोल मैत्रीची बोलकी गोष्ट घेऊन ‘पिटर’ येतोय २२ जानेवारीला!

मालिकेमधील भूमिकेबाबत बोलताना नेहा म्‍हणाली, ''प्रेक्षकांना मालिकेत अनेक नवीन गोष्‍टी पाहायला मिळणार आहेत. मी याबाबत आता सविस्‍तरपणे सांगू शकत नाही. प्रेक्षकांसाठी ते सरप्राईज आहे. पण, मी एका गोष्‍टीची निश्चितच खात्री देऊ शकते की मोहकता, ग्‍लॅमर, हास्‍य व धमाल याची कमतरता नसेल. त्‍यासाठी तुम्‍हाला आगामी एपिसोड्सची वाट पाहावी लागेल.

हेही वाचा - इफ्फीत गोवा विशेष विभाग; सात कोकणी चित्रपटांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details