मुंबई- सेलिब्रिटी जोडपी रुबीना दिलाईक आणि अभिनव शुक्लाचा नवीन म्युझिक व्हिडिओ मर्जानेयाचा पहिला लुक गायिका नेहा कक्करने बुधवारी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
ही बातमी रुबीना आणि अभिनव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरही शेअर केली होती. म्युझिक व्हिडिओ १८ मार्च रोजी रिलीज होईल. पहिल्या लूकमध्ये अभिनव क्रीम शॉर्ट्ससह निळा आणि गुलाबी प्रिंट केलेला शर्ट परिधान केलेला दिसत आहे आहे, तर रुबीना नारंगी रंगातील बिकनी टॉप आणि स्कर्टमध्ये थिरकली आहे.