महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'माझ्या नावाचा वापर करु नको', नेहा कक्कडने हिमांशला भरला सज्जड दम - Himansh Kohali latest news

हिमांश कोहलीने अलिकडे दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रेकअप होण्यास नेहा कक्कड जबाबदार असल्याचे म्हटलंय. यावर नेहाला राग आला आणि तिने हिमांशला दम भरलाय.

Neha Kakkar angry on Himansh Kohali statement
नेहा कक्कडने हिमांशला भरला सज्जदड दम

By

Published : Feb 20, 2020, 12:55 PM IST

मुंबई - गायिका नेहा कक्कड आणि हिमांश कोहलीचा ब्रेकअप झालाय. ब्रेकअपनंतर बऱ्याच गोष्टी बिघडत गेल्या. याच शृंखलेत हिमांशने ब्रेकअपला नेहा जाबाबदार असल्याचे एका मुलाखतीत म्हटलंय. यानंतर नेहाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित नाव न घेता रागाने हिमांशला उत्तर दिलंय.

नेहाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी नेहासह फनी डान्स करत आहे आणि अखेर फ्रेममध्ये पाहात हसताना दिसते.

या व्हिडिओच्या कॅप्शनची सुरूवात नेहाने आपल्या आनंदी आयुष्याबद्दल केलीय आणि हिमांश कोहलीकडे इशारा करीत रागाने म्हणते, प्रसिध्द होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करु नकोस. जर तू वापरलेस तर तुझ्या आईने आणि बहिणींनी माझ्यासोबत काय केले त्याचाही भांडाफोड करेन.

नेहाने लिहिलंय, ''लव्ह यु गुड्डू. ईश्वराच्या दयेने माझ्या जवळ प्रत्येक गोष्ट आहे जी हवी असते. मी आनंदी आयुष्य जगत आहे. याचे एकमेव कारण चांगले कर्म आहेत. जे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात ते माझ्यावर जळणारे खोटारडे आहेत.''

नेहाने पुढे लिहिलंय, ''प्रसिध्दी मिळवण्यासाठी तो माझ्या नावाचा वापर करत आहे. पूर्वीही वापर केलाय आणि माझ्या माघारीही करतोय. ओय ! माझ्यामुळे नाही...तर आपल्या कामाच्या जीवावर प्रसिध्द हो. पुन्हा प्रसिध्द होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करु नकोस..नाहीतर मी तुझ्या आई, बहिण आणि पापाने जे काही त्यांनी माझ्यासोबत केले आणि म्हटले त्या कर्मांचेही भांडाफोड करेन. मी तुला इशारा देते की माझ्या नावाचा वापर करु नको आणि जगाच्यासमोर फार बिच्चारा होण्याचा प्रयत्नही करु नको. मला व्हिलन बनवण्याचा प्रयत्न करु नको. माझ्यापासून आणि माझ्या नावापसून दूर रहा.''

नेहा आणि हिमांशच्या ब्रेकअपनंतर अलिकडे एका मुलाखतीत हिमांश म्हणाला होता, ''अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळी घडल्या होत्या त्याचा उल्लेख मला करायचा नाही. इतकेच सांगू शकतो की तिला हे नाते पुढे वाढवायचे नव्हते. म्हणून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.''

ABOUT THE AUTHOR

...view details