महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आदित्य नारायण आणि नेहा कक्कडच्या 'गोवा बीच' व्हिडिओला तुफान प्रतिसाद - Goa Beach song release

गायिका नेहा कक्कड आणि आदित्य नारायण ही जोडी सध्या बरीच चर्चेत आहे. सध्या त्यांचा 'गोवा बीच' या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

Goa Beach song release
'गोवा बीच' गाण्याच्या व्हिडिओला तुफान प्रतिसाद

By

Published : Feb 11, 2020, 7:15 PM IST


बॉलिवूड गायिका नेहा कक्कड आणि आदित्य नारायण या जोडीचे 'गोवा बीच' हे गाणे रिलीज झाले आहे. टोनी कक्कड आणि नेहाने हे गाणे गायले आहे. या गाण्यात नेहा पुरुषांना लुटणारी दाखवण्यात आलंय. नेहा आणि आदित्य सध्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलाय.

'गोवा बीच' हे गाणे १० फेब्रुवारीला रिलीज झाले. गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासातच १० लाख व्यूव्ह्ज मिळाले आहेत.

नेहा कक्कड गायिका म्हणून बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. २००६ च्या 'इंडियन आयडॉल'मध्ये तिने भाग घेतला होता. सध्या ती या शोची जज आहे. यापूर्वी तिने हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्याची बातमी सोशल मीडियावरुन दिली होती. सध्या तिच्या आणि आदित्यच्या नात्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details