'कपडे महत्वाचे होते की गायनकौशल्य?' नेहा भसीनने सांगितला स्टेजवरुन हाकलून दिल्याचा किस्सा - नेहा नेहमीच सकारात्मकता दर्शविते
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ‘फाटक्या जीन्सबद्दल वक्तव्य केल्यानंतर हा विषय वादग्रस्त बनला. गायिका नेहा भसीन हिने ‘आयपीएमएल’च्या मंचावर ‘कपड्यांवरून’ तिच्या झालेल्या अपमानासंदर्भात किस्सा सांगितला. एका कार्यक्रमात ती अर्धी चड्डी अर्थातच शॉर्ट्स घालून गेली होती. ती तेथे गाणार होती. परंतु आयोजकांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिला अपमानित करत स्टेजवरून जवळपास हाकलून दिले. हे सांगताना ती म्हणाली की, तिचे कपडे महत्वाचे होते की गायनकौशल्य?
मुंबई - उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ‘फाटक्या जीन्सबद्दल वक्तव्य केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला तर अनेकांनी विनोदी शैलीत त्याचा समाचार घेतला. गायिका नेहा भसीन हिने ‘आयपीएमएल’च्या मंचावर ‘कपड्यांवरून’ तिच्या झालेल्या अपमानासंदर्भात किस्सा सांगितला. एका कार्यक्रमात ती अर्धी चड्डी अर्थातच शॉर्ट्स घालून गेली होती. ती तेथे गाणार होती. परंतु आयोजकांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिला अपमानित करत स्टेजवरून जवळपास हाकलून दिले. खरंतर शॉर्ट्स घालणे हे बऱ्याच वर्षांपासून फॅशनमध्ये आहे आणि तिच्यामते तिने कुठलेही ओंगळ वाटेल असे कपडे परिधान केले नव्हते. तरीही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींनी तिने घातलेल्या कपड्यांना बोल लावत तिला परफॉर्म करू दिले नाही. तिला प्रश्न पडला होता की त्यांना तिचे कपडे महत्वाचे होते की गायनकौशल्य?