मुंबई- पंजाब विधानसभा निवडणूक 2022 मध्ये सत्ताधारी काँग्रेस पराभूत झाली आहे. आम आदमी पक्षाने या राज्यात सत्ता ताब्यात घेतली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू मोठ्या फरकाने निवडणूक हारले आहेत. त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे.
निवडणूक हारल्यानंतर सिध्दूला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. तर काहीजण त्यांना पुन्हा एकदा कपिल शर्मा शोमध्ये परत जाण्यास सांगत आहेत. देशातील पाच राज्यांच्या (उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर) विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता अन्य राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे.
निवडणूक हारल्यानंतर सिध्दूचे ट्विट
हारल्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी ट्विटरवर लिहिले की, ''लोकांचा आवाज हा इश्वराचा आवाज आहे. पंजाबच्या लोकांचा कौल विनम्रतेने स्वीकार करतो. आम आदमी पार्टीला शुभेच्छा."
काही लोकांनी सिध्दूला आम आदमी पार्टीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण जनतेला आता नाटक आणि कॉमेडी नको आहे. काही ट्रोलर्सनी सिध्दू यांना शिवसेना ज्वाईन करण्याचाही सल्ला दिला. काहींनी म्हटलंय की, ''सिध्दूने काँग्रेसचा धुव्वा उडवला.''
सिध्दू हारल्यानंतर एका युजरने कपिल शर्मासोबतचा सिध्दूचा फोटो शेअर करीत लिहिले की, 'चला कपिलच्या शोमध्ये जाऊयात.'
हेही वाचा -भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या केआरकेला ट्रोलर्सनी घेरले