महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 31, 2021, 12:10 AM IST

ETV Bharat / sitara

नादखुळा म्युझिकचे पहिले गाणे ‘आपली यारी', १२ तास, १० लाख व्ह्यूज!

नादखुळा म्युझिक लेबलच्या ‘आपली यारी’ या गाण्याने विक्रम केला आहे. या गाण्याला निव्वळ १२ तासांमध्येच १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रशांत नाकतीने संगीत दिले असून आदर्श शिंदे व सोनाली सोनावणे यांनी स्वरसाज दिला आहे.

The song 'Aapli Yari' set a record
‘आपली यारी’ या गाण्याने विक्रम केला

बॉलिवूड निर्माता निखील नमीतने नुकतेच नादखुळा म्युझिक लेबलची स्थापना केली आणि त्याअंतर्गत पहिले गाणे ‘आपली यारी' प्रदर्शित करण्यात आले जे अभिनेत्री प्रार्थना बेहरेने प्रकाशित केले. नादखुळा म्युझिक लेबलच्या ‘आपली यारी’ या गाण्याने विक्रम केला आहे. या गाण्याला निव्वळ १२ तासांमध्येच १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रशांत नाकती ने संगीत दिले असून आदर्श शिंदे व सोनाली सोनावणे यांनी स्वरसाज दिला आहे. 'आपली यारी' गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

‘आपली यारी’ या गाण्याने विक्रम केला

निर्माता निखील नमीत याने सांगितले की महाराष्ट्रातील सध्याच्या पूरपरिस्थितीमुळे ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देण्यात येणार आहेत. १२ तासांत या गाण्याने १० लाख व्ह्यूजचा टप्पा गाठला असून निखिल याचे पूर्ण श्रेय प्रशांतच्या सुरेल संगीताला देतो.

बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे. नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे.”

सर्वात कमी वेळात १० लाख क्रॉस केलेले ‘आपली यारी' हे पहिले मराठी गाणे बनल्यामुळे प्रशांत नाकती प्रचंड खूष आहे. 'मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनियर म्युझिक डायरेक्टर' अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे.

हेही वाचा - जिया खान मृत्यू प्रकरण : 8 वर्षे प्रलंबित खटला सीबीआय कोर्टात चालणार

ABOUT THE AUTHOR

...view details