मुंबई - सारेगमप लिटील चॅम्प्सचं नवं सीजन नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या सीजनमध्ये गायनाच्या क्षेत्रात इतिहास घडवणारे पंचरत्न परिक्षकाच्या खुर्चीवर बसून आता नव्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करत आहेत. लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकत आहे. घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे आणि याच निमित्ताने कार्तिकी सोबत साधला हा खास संवाद....
१. १२ वर्षांनी पुन्हा एकदा सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्व सुरु झालं आहे. त्याबद्दल काय सांगशील?
- या पर्वाची उत्सुकता खूपचं होती आणि आता हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे आणि सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पहिलं पर्व हे खूप गाजलं. प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आम्हाला मिळालं आणि आता या नवीन पर्वाची दमदार सुरुवात नुकतीच झाली आहे, यातील स्पर्धक खूप उत्तम आहेत, आणि प्रेक्षक या पर्वाला देखील प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत याचा मला आनंद आहे.
२. सारेगमप या कार्यक्रमाने तुम्हा ५हि पंचरत्नांना संगीत क्षेत्रात मोठा ब्रेक दिला, त्याच मंचावर पुन्हा एकदा तुम्ही आहेत पण एका वेगळ्या भूमिकेत, कसं वाटतंय?
- सारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. या कार्यक्रमातील आमचा प्रवास हा आमच्यासाठी अविस्मरणीय असा आहे. एक आई जशी आपल्याला बाळाला नेहमी जवळ करत असते तसंच झी मराठीने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आमच्या पर्वा नंतरदेखील आम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आमची कला सादर करण्याची संधी दिली त्यामुळे आमची या कार्यक्रमाशी असलेलं नातं अधिकचं दृढ होत गेलं आणि आता पुन्हा याच मंचावर ज्यूरीच्या भूमिकेतून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहोत त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे पण सगळ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास पाहता आम्ही ती जबाबदारी नीट पार पडू अशी खात्री आहे. याच मंचावर पुन्हा एकत्र आल्यामुळे जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय.
३. १२ वर्षांनंतर तुम्ही पाच जण एकत्र आला आहात, त्याबद्दल काय सांगशील?