समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लीम असा नवा मीडियामध्ये रंगताना दिसत आहे. समीर वानखेडे यांनी ही गोष्ट मान्य केली आहे की त्यांचे वडील हिंदू होते आणि आई मस्लीम होत्या. आपले पहिले लग्न मुस्लीम असलेल्या डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत झाले होते. 2016 मध्ये परस्पर संमतीने त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांनंतर त्यांनी क्रांती रेडकर यांच्याशी विवाह केला होता. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना समीर यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर आपण व समीर दोघेही जन्मतः हिंदू असल्याचा खुलासा केलाय.
क्रांती यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय, '' मी आणि माझा नवरा समीर दोघेही जन्मतः हिंदू आहोत. आम्ही कोणतेही धर्मांतर केलेले नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू होते आणि माझ्या मुस्लीम असलेल्या सासूंशी विवाह केला होता, ज्या आता हयात नाहीत. समीरचे अगोदरचा विवाह विशेष विवाह कायद्यानुसार झाला होता आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमचा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार झालाय.''
क्रांतीने ट्विटवर आपले दोन विवाहाचे फोटो शेअर केलाय. एका फोटोत ती व समीर लग्नानंतर हार प्रदान करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ती विवाहानंतर आपल्या आई वडिलांसोबत व इतर नातेवाईकांसोबत दिसत आहे.
समीर वानखेडेंचा क्रांती रेडकरसोबत झाला होता दुसरा विवाह