मुंबई -बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटासाठी त्याने वजनही घटवले आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाला संगीतकार प्रितम यांचे संगीत मिळणार असून त्यांनी आमिर सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आमिर खानच्या पाचगणी येथील निवासस्थानी चित्रपटाचे संगीत तयार करण्यात येत आहे. प्रितम यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिर खानसोबत अमिताभ भट्टाचार्य आणि दिग्दर्शक अद्वेत चंदन हे देखील पाहायला मिळतात.