‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. नुकतेच या सिरीजच्या म्युझिक अल्बमचे अनावरण करण्यात आले. अमेझॉन प्राईम व्हिडीओची प्रस्तुती असलेल्या 'मुंबई डायरीज़ 26/11' च्या म्यूझिक अल्बममध्ये दहा भावपूर्ण साउंडट्रॅक सामील आहेत. ये हालात, तू दफन भी, पार होगा तू, अनन्या का थीम- इनर स्ट्रेंथ, द डिपार्टेड, द ऑफ्टरमॅथ, फ्लॅशिंग बॅक, दिया थीम- ऑन थिन आइस, प्रोफेट्स ऑफ डूम आणि मुंबई डायरीज टाइटल थीम यांचा समावेश आहे.
संगीतकार आणि निर्माता आशुतोष फाटक यांनी या गाण्यांवर संगीतोपचार केले आहेत. ये हालात, तू दफ़न भी आणि पार होगा तू या गाण्याचे बोल नीरज अय्यंगार यांनी लिहिले असून जुबिन नौटियाल आणि जारा खान (ये हालात), नसीरुद्दीन शाह आणि अल्तमश फरीदी (तू दफ़न भी) आणि आनंद भास्कर (पार होगा तू) यांनी आवाज दिला आहे. ही सर्व गाणी सिरीजच्या कथानकासमवेत ताळमेळ साधतात आणि प्रभावशाली संदेश देतात.