महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"भारताची लेक म्हणवून घेताना लाज वाटतेय", अफेयरच्या चर्चेवर बबिता संतापली - Babita got angry over the discussion of the affair

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसणाऱ्या मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर दोन पोस्ट केल्या आहेत. यामध्ये तिने माध्यमांना आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या मानसिकतेबद्दल फटकारले आहे. मुनमुन दत्ताने पहिल्या पोस्टमध्ये मीडिया आणि त्यांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अफेयरच्या चर्चेवर बबिता संतापली
अफेयरच्या चर्चेवर बबिता संतापली

By

Published : Sep 14, 2021, 4:22 PM IST

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बबिता ही व्यक्तीरेखा साकारत असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियावर दोन पोस्ट लिहिल्या आहेत. यामध्ये तिने माध्यमांना आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या मानसिकतेबद्दल फटकारले आहे. मुनमुन दत्ताने पहिल्या पोस्टमध्ये मीडिया आणि त्यांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मुनमुन दत्ताने लिहिले आहे, "तुम्हाला काल्पनिक बातम्या प्रकाशित करण्याचा अधिकार कोणी दिला आहे. तुम्ही कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्याबद्दल बातम्या कशा लिहू शकता. तुम्हा लोकांच्यामुळे एखाद्याला मानसिक त्रास होतो याला कोण जबाबदार आहे. तुम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेतही दुःखी महिलेच्या चेहऱ्यावर कॅमेरा रोखण्यासा मागेपुढे पाहात नाही."

"तुम्ही लोक तुमच्या बातम्या सनसनाटी बनवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकता, परंतु तुम्ही लोक त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची जबाबदारी घ्याल नाहीतर तुम्हा लोकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे.

मुनमुनने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "हे सामान्य नागरिकांसाठी आहे. मला तुमच्या लोकांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, पण तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ज्या प्रकारची दुर्गंधी पसरवली आहे ते चुकीचे आहे. शिकल्या सवरलेल्या लोकांनीही असे केलंय हे दुर्दैवी आहे. महिलांना नेहमीच त्यांच्या वयावरुन आणि इतर गोष्टीवरुन बदनाम केले जाते. तुम्ही केलेली मस्करी दुसऱ्यांसाठी मानसिक त्रासाची गोष्ट ठरते."

"मी तेरा वर्षापासून लोकांचे मनोरंजन करत आहे, पण तुम्ही लोकांनी माझी प्रतिमा खराब करण्यास 13 मिनिटेही लावली नाहीत. पुढच्या वेळी जर एखाद्या वैद्यकीयदृष्ट्या निराश व्यक्तीने आपले जीवन संपवले, तर ते तुमच्या शब्दांमुळे असेल तर नाही याचा तुम्ही विचार कराल. आज मला स्वतःला भारताची लेक म्हणवून घेताना लाज वाटतेय."

अलिकडे सोशल मीडियावर मुनमुन दत्ता आणि तारक मेहता मालिकेतील टप्पूची भूमिका करणारा अभिनेता राज अनादकट यांच्यात प्रेम प्रकरण असल्याची चर्चा रंगत होती. दोघांनीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मात्र मुनमुन दत्ताने अशी चर्चा घडवणाऱ्या लोकांना आणि प्रसार माध्यमांना सडेतोड उत्तर देऊन आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचा - कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details