महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पाताल लोक'चा मीम शेअर करुन मुंबई पोलिसांनी साधला फेक न्यूजवर निशाणा - मुंबई पोलिसांनी

पाताल लोक ही वेब-मालिका प्राईम व्हिडिओवर स्ट्रिमिंग झाली आणि प्रेक्षकांनी मालिकेला डोक्यावर घेतले आहे. आता याचे भरपूर मीम्स तयार होत असून फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर टीका करणारा एक मीम मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

Patal Lok
पाताल लोक

By

Published : May 18, 2020, 8:42 PM IST

मुंबई - अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शनने बनवलेल्या 'पाताल लोक' या वेब-मालिकेवर फॅन्स खूश झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे काही मीम्सही तयार झाले आहेत. यातीलच एक मीम मुंबई पोलिसांनी शेअर करुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या वेब-सिरीजचा एक मीम शेअर करण्यात आला आहे. यात पोलीस इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी आपल्या सहाय्यक पोलीस अधिकारी अन्सारी याला धरती, पाताल आणि स्वर्ग लोक यांच्याबद्दल समजावत आहे. हाथीरीम म्हणतो, तसे तर शास्त्रात लिहिले आहे, पण मी व्हॉट्सएपवर वाचले आहे. मुंबई पोलिसांनी हा सीन शेअर करीत लिहिले आहे, 'फेक न्यूज पसरवणाऱ्यांना जेव्हा विचारले जाते, की तू हे कुठे वाचलेस... तेव्हा त्याचंही उत्तर असेच असते.'

पुढे मुंबई पोलिसांनी असेही ट्विट केले आहे, ''प्रिय मुंबईकरांनो,

समाजमाध्यम आणि तंत्रज्ञान यामुळे आपण एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आज, सामाजिक अंतर राखूनही आपण एकत्र आहोत.

मात्र, अफवांच्या माध्यमातून निर्माण होणार गोंधळ आपले नुकसान करू शकतो. सावध राहा. अफवा पसरवू नका.''

'पाताल लोक' या वेब-सिरीजला सोशल मीडियावरून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. सेलेब्सपासून ते सामान्य लोक याचे कौतुक करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details