मुंबई - कानून के हाथ लंबे होते है... हा संवाद अनेक चित्रपटांमध्ये आपण ऐकलाय. एखादा सस्पेन्स सिनेमा असला की त्यामध्ये हे वाक्य सर्रास असतं. ...आणि हे वाक्य असायलाच हवं. त्याशिवाय तपासाला मजाच येत नाही. आत्तापर्यंत आपण खाकीमधले पोलीस जवान पाहिले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हातामध्ये काठी घेऊन बेशिस्त त्यांना सरळ करताना पाहिले. एखाद्या गुन्ह्याचा छडा काही तासांमध्ये लावताना पाहिले. इतकेच काय तर मुंबई पोलिसांच्या दहशतीमुळे आणि गुंड देश सोडून फरार झाले आहेत. मात्र आत्ता जे आम्ही तुम्हाला मुंबई पोलिसांचं रूप दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
हे आहेत आपल्या मुंबईतले पोलिस जवान. एरवी आपण या पोलीस जवानांचा बँडपथक पाहत असतो. 26 जानेवारी असेल 15 ऑगस्ट असेल यावेळेस हे बँड पथक आपल्याला पाहायला मिळतं. देशभक्तीपर गीतं या बँड वर वाजवली जातात. अतिशय मंत्रमुग्ध करणारी धून ऐकल्यानंतर आपण कितीही तणावात असलो तर मनाला शांती मिळते. आणि एक राष्ट्रभक्तीची भावना मनामध्ये जागृत होते.