महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘टीआरपी’ रेटिंग्समध्ये ‘मुलगी झाली हो’ नंबर १ वर, स्टार प्रवाहची जबरदस्त आघाडी - Zee Marathi's 'Devmanus' series in fourth place

‘टीआरपी’ रेटिंग्समध्ये ‘मुलगी झाली हो’ नंबर १ वर, तर ५ पैकी ४ मालिकांसह स्टार प्रवाह आघाडीवर!

mulagi-zali-ho-at-no-1-in-the-trp-ratings
‘टीआरपी’ रेटिंग्समध्ये ‘मुलगी झाली हो’

By

Published : Jun 15, 2021, 7:33 PM IST

टेलिव्हिजन वरील कार्यक्रम, शोज आणि मालिका यांना प्रेक्षक पाठिंबा किती आहे यावर त्याची लोकप्रियता ठरते. ‘टीआरपी - बार्क’ रेटिंग्स वरून कळते की कुठली मालिका वा कार्यक्रम ‘टॉप’ ला आहे. अर्थातच हे रेटिंग्स आठवड्यागणिक पुढेमागे होत असतात. स्टार प्रवाह ही मराठी वाहिनी दर्जेदार मालिकांची निर्मिती करीत आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब झालाय ‘टीआरपी - बार्क’ रेटिंग्स मुळे. या वाहिनीच्या तब्बल ५ मालिका पहिल्या पाच स्थानांवर असून प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार ‘मुलगी झाली हो’ ही मालिका पहिला क्रमांक धरून बसली आहे. मध्यंतरी तिचे रेटिंग थोडेसे घसरले होते कारण यातील मुख्य कलाकार गायब होते. खरंतर त्यांना कोरोना झाला होता म्हणून काही आठवडे ही मालिका नवीन भाग दाखवू शकत नव्हती. परंतु आता सर्वकाही आलबेल असून पूर्ण ताकतीनिशी मालिकेचे चित्रीकरण सुरु असून तिने पुन्हा आपला पहिला क्रमांक पटकावला आहे. ही मालिका तेलगू मालिका ‘मौन रागम’ याचा रिमेक आहे.

‘टीआरपी’ रेटिंग्समध्ये ‘मुलगी झाली हो’ नंबर १ वर

सर्वेक्षणानुसार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ यांचे क्रमांक आहेत अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि पाचवा आहे. चौथ्या क्रमांकावर आहे झी मराठी ची मालिका ‘देवमाणूस’.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेत मुलगी माऊ आणि वडील यांच्यात आता सलोख्याचे नाते निर्माण झाले असून वडिलांना पश्चातापही होतो. या मालिकेत दिव्या पुगावकर, योगेश सोहोनी, शर्वाणी पिल्ले आणि किरण माने यांच्या प्रमुख भूमिका असून पॅनोरमा एंटरटेन्मेन्ट प्रा ली निर्मिती या मालिकेत नवीन वळणं येताहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. ही मालिका बंगाली मालिका ‘अपोन के पोर’ यावर बेतलेली असून याची निर्मिती महेश आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची आहे. या मालिकेत माधवी निमकर, पूजा ठोंबरे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

झी मराठीची ‘देवमाणूस’ मालिका चौथ्या स्थानावर

रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले यांची जोडी असलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’ ची निर्मिती राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स ची असून यात अनघा अतुल, अभिज्ञा भावे आणि हर्षदा खानविलकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका ‘करुथामुथू’ या मल्याळम मालिकेचा अधिकृत रिमेक आहे. झी मराठीची ‘देवमाणूस’ ही मालिका सातारा मध्ये घडलेल्या हत्याकांडाच्या सत्य घटनेवर आधारित असून यात किरण गायकवाड, अस्मिता देशमुख, नेहा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदे यांनी ‘वज्र प्रॉडक्शन्स’ या बॅनर अंतर्गत याची निर्मिती केली आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका शशी सुमीत प्रॉडक्शन्स ची निर्मिती असून ती ‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकेचा अधिकृत रिमेक आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, हर्षद अतकरी यांच्या प्रमुख भूमिका असून ऐश्वर्या शेटे, निकिता पाटील आणि अदिती देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

तर, सध्या तरी स्टार प्रवाह वाहिनी ‘टीआरपी’ रेटिंग्स मध्ये पहिल्या ५ पैकी ४ मालिकांसह आघाडीवर आहे.

हेही वाचा - 'लगान'ची २० वर्षे : अजूनही आमिर खान असतो 'टीम'च्या संपर्कात

ABOUT THE AUTHOR

...view details