मुंबई - मृण्मयी देशपांडे आणि सिध्दार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'मिस यु मिस्टर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात डिस्टन्स रिलेशनशिप जपणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. नातेसंबंधांवर आधारित असलेला हा चित्रपट हसत खेळत डोळ्याच्या कडा पाणावतील, अशा पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटात काम करण्याचा एकंदर अनुभव कसा होता, हे अभिनेत्री मृण्मयी देशपांडेकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी...
गोड असलेलं अवघड नातं म्हणजे 'मिस यु मिस्टर' - मृण्मयी देशपांडे
महाविद्यालयात असताना 'पोपटी चौकट' ही एकांकिका, त्यानंतर 'हम ने जिना सिख लिया' हा सिनेमा आणि त्यानंतर 'अग्निहोत्र' ही मालिका एकत्र करणारी मृण्मयी- सिद्धार्थ यांची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र अली आहे.
एकमेकांच्या करिअरला स्पेस देतानाच नात्यातली बूज राखणारी अनेक जोडपी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही जोडपी तर परदेशातही वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने एकमेकांना वीकेंड पुरतीच भेटतात. त्यांच्यातील समंजसपणा बाबत त्यांच्या कुटूंबीयांना आणि अनेकदा वृत्तपत्रांना प्रचंड कौतुक असत. अशा जोडप्यावर 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी आवर्जून लेख छापून येतात. मात्र, या जोडप्यांचे आयुष्य खरच तेवढं सोपं असत का? त्यांच्या नात्यातला समंजसपणा खरा असतो की फक्त समाजाला दाखवण्यापूरता असतो? त्यांच्यात वाद झाले तर नक्की ते सुटतात की चिघळतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'मिस यु मिस्टर' या चित्रपटाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महाविद्यालयात असताना 'पोपटी चौकट' ही एकांकिका, त्यानंतर 'हम ने जिना सिख लिया' हा सिनेमा आणि त्यानंतर 'अग्निहोत्र' ही मालिका एकत्र करणारी मृण्मयी- सिद्धार्थ यांची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र अली आहे. मृण्मयीने या चित्रपटात पुण्यात राहणाऱ्या 'कावेरी' या मुलीची भूमिका केली आहे. तर, सिद्धार्थ हा लंडनमध्ये कामासाठी गेलेल्या 'वरुण' या तरुणांची भूमिका साकरतोय. या दोघांशिवाय राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर आणि राधिका क्षीरसागर यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे.