पुणे - मध्य प्रदेश राज्य सरकारच्या संस्कृती विभागाच्या वतीने साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी मान्यवरांना ‘शिखर सन्मान’ पुरस्कार प्रदान केला जातो. अतिशय मानाच्या या पुरस्कारासाठी यंदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांची निवड करण्यात आली आहे.
पं. विजय घाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘शिखर सन्मान’ पुरस्कार जाहीर - MP govt. declared Shikhar Sanman award to Tabala player Pandit Vijay Ghate
मध्य प्रदेश राज्य शासनाच्या संस्कृती विभागाच्या वतीने येणारा ‘शिखर सन्मान’ पुरस्कार तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पं. विजय घाटे
एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार दि. १८ नोव्हेंबर २०१९ ला भोपाळ येथे पं. विजय घाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.