मुंबई- टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते. अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या सुट्टीतील तिचे बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत. गेल्या वर्षी अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्यांनी खूप जोर पकडला होता. आता मात्र मौनीच्या लग्नाची निश्चित तारीख समोर आली आहे. परदेशातच नाही तर देशातच मौनी तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी लग्न करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. आता बातमी आहे की ती 27 जानेवारीला गोव्यात तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीच वेडिंग करणार आहे. याआधी गोव्यात नाही तर दुबईत मौनी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, मौनी आता गोव्यात लग्न करणार आहे.