महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मौनी रॉयचा सासरी गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ - Suraj Nambiar wedding

मौनी रॉयने विवाहानंतर तिच्या सासरच्या घरात प्रवेश केला आहे. यावेळी नवविवाहित जोडप्यामध्ये अंगठी शोधण्याचा विधीही पार पडला.

मौनी रॉयचा सासरी गृहप्रवेश
मौनी रॉयचा सासरी गृहप्रवेश

By

Published : Jan 31, 2022, 4:33 PM IST

हैदराबाद- टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने 27 जानेवारी रोजी दक्षिण भारतीय ( मल्याळी) आणि बंगाली पध्दतीने बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न केले. आता मौनी रॉयच्या सासरच्या घरातील एन्ट्रीचे फोटो समोर आले आहेत. यासोबतच मौनी आणि सूरजमधील रिंग फाइंडिंग सेरेमनीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या रविवारी सूरज आणि मौनी हनीमूननंतर दुबईहून परतले होते. त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर देखील वर्चस्व गाजवले होते.

लग्नानंतरच्या विधींमध्ये मौनी रॉयच्या घरातील प्रवेश आणि अंगठी शोधण्याच्या सोहळ्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये मौनी आणि सूरज खूपच सुंदर दिसत आहेत. यामध्ये मौनीने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे. मंगने लाल स्लीव्हलेस ब्लाउज घातलेला आहे ज्यात सिंदूर आणि कानात जड झुमके दिसत आहेत.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार

मौनीने दुबईतील एन्जॉय करतानाचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी आणि सूरज या सुंदर क्षणाचा आनंद लुटताना दिसत आहेत. मौनीने फ्लॉवर प्रिंटमध्ये शॉर्ट फ्रॉक घातला आहे आणि सुरज कॅज्युअल पँट शर्टमध्ये मस्त दिसत आहे.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी मौनी रॉय गोव्यात तिच्या मैत्रिणींना ग्रँड पार्टी देण्यासाठी आली होती. तिथून तिच्या पार्टीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय पोपटी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

मित्रांसोबत सूरज नांबियार

मौनी रॉयने तीन वर्षे अफेअर केल्यानंतर सूरज नांबियारशी लग्न केले आहे. 2019 च्या न्यू इयर पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती, तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री मौनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा -मिस यूएसए चेस्ली क्रिस्टचा 60 मजली इमारतीवरून पडून गुढ मृत्यू, हरनाझ संधूने व्यक्त केला शोक

ABOUT THE AUTHOR

...view details