महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'डिअर फ्युचर हसबंड' या गाण्यावर थिरकली मिथिला पालकर - मिथिला पालकर उत्तम डान्सर

अभिनेत्री गायिका असलेली मिथिला पालकर उत्तम डान्सरदेखील आहे. तिच्या सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय राहून चाहत्यांना मनोरंजनाचा खुराक पोहोचवत असते. यावेळी तिने मेघन ट्रेनरच्या डिअर फ्युचर हसबंड या गाण्यावर धमाल नृत्य करीत अतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मिथिला पालकर
मिथिला पालकर

By

Published : Nov 16, 2021, 7:10 PM IST

अभिनेत्री गायिका असलेली मिथिला पालकर उत्तम डान्सरदेखील आहे. तिच्या सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय राहून चाहत्यांना मनोरंजनाचा खुराक पोहोचवत असते. यावेळी तिने मेघन ट्रेनरच्या डिअर फ्युचर हसबंड या गाण्यावर धमाल नृत्य करीत अतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

15 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या 'लिटिल थिंग्ज'च्या शेवटच्या सीझनमध्ये झळकल्यानंतर मिथिला पालकरने व्हायरल डान्स ट्रेंडमध्ये भाग घेऊन चाहत्यांना आनंद दिला आहे. नवीन इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये मिथीला मेघन ट्रेनरच्या डिअर फ्युचर हसबंड या गाण्यावर नाचताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय: "प्रिय भावी पती, तुझ्यासाठी एक संदेश आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा."

मिथीला पालकर या गाण्याच्या बोलमध्ये म्हणताना दिसते की, "मला अशा तारखेला घेऊन जा, ज्यासाठी मी पात्र आहे. आणि, प्रत्येक अॅनव्हर्सरीला फुले आणायला विसरू नकोस. कारण जर तू माझ्याशी योग्य वागले तर मी परिपूर्ण पत्नी होईन."

या कॅप्शनमुळे अनेक चाहत्यांना तिच्या 'लिटिल थिंग्ज' वेब सिरीजचा शेवटचा सीझन आठवला. यात काव्या कुलकर्णी ( मिथीलाने साकारलेले पात्र) धृव (ध्रुव सहगलला) याच्यासोबत एंगेजमेंट करते. अनेकांनी धृव सहगलला क्लिपच्या कमेंटमध्ये टॅग केले आहे.

हेही वाचा - 'पृथ्वीराज'साठी मी माझे हृदय, आत्मा आणि अश्रू दिले मानुषी छिल्लर

ABOUT THE AUTHOR

...view details