मुंबई - भारतीय महिला संघाची खेळाडू मिताली राज 'द कपिल शर्मा शो'मध्ये आली होती. यावेळी महिला क्रिकेट आणि खेळाडूंच्या अनेक गोष्टींचे रहस्य उलगडले. या आठवड्या अखेर याचे प्रसारण होईल. या शोमध्ये मिताली राजसोबत वेदा कृष्णमुर्ती आणि झूलन गोस्वामी या खेळाडूंनीही सहभाग घेतला.
या महिला खेळाडूंनी केवळ आपल्या आयुष्यातील छुप्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर अनेक हास्यस्फोटदेखील घडवले. मितालीने क्रिकेटर होण्यापूर्वी काय करीत होते याचे रहस्यही या शोमध्ये सांगितले.