मुंबई - कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. याचा मुकाबला एकत्र आल्या आहेत. यामध्ये भारताची मानुषी छिल्लर (मिस वर्ल्ड 2017), प्यूर्टो रिको येथील स्टेफनी डेल वॅले, (मिस वर्ल्ड 2016) आणि मेक्सिको येथील वॅनेसा पोन्स (मिस वर्ल्ड 2018) यांचा समावेश आहे.
याबद्दल बोलताना मानुषी म्हणाली, "अशा प्रसंगी, आपल्यातील देशांमध्ये आणि समुदायांमध्ये कोव्हिड -१९ बद्दल अधिक जागरूकता वाढविण्याचे काम प्रत्येक जण करु शकतो. व्हायरसचा ट्रॅक थांबविण्याची ही गुरुकिल्ली असेल. मला लोकांना सांगायचे आहे की, आम्ही एकत्र आहोत आणि भारतात जे घडत आहे ते उर्वरित जगातही घडत आहे. "